आदित्य ठाकरे यांची आज गोरेगावात शिवगर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील प्रचंड जाहीर ‘शिवगर्जना’ सभेपासून सुरू झालेला झंझावात अवघ्या महाराष्ट्रात घुमणार आहे. यामध्ये रविवार, 12 मार्च रोजी गोरेगावमध्ये शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘शिवगर्जना’ सभा होणार आहे.

गद्दार ‘मिंध्यां’नी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरले असले तरी निष्ठावंतांच्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली असून राज्यभरात ‘शिवगर्जना’ सभांचे आयोजन केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार 12 मार्च रोजी सायंकाळी गोरेगाव पूर्वेकडील छत्रपती संभाजी मैदानावर सायंकाळी 6 वाजता ‘शिवगर्जना’ सभा आयोजित करण्यात आली आहे. या ‘शिवगर्जना’ सभेच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे.