नगर जिल्ह्यात पोलिसांनी सहा गुंड तडीपार केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून गुंडांचे धाबे दणाणले आहे.
नगर जिल्ह्यातल्या जामखेड परिसरात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ दमदाटी करणे, खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच विनापरवाना बंदुकी वापरणे असे विविध कलमान्वये गुन्हे केल्यानं जामखेड पोलीस स्टेशन येथे या गुंडांविरोधात गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी ते घातक आहेत, अशा सहा गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील गुंडांचे धाबे दणाणले आहेत. यातील चार गुंडांना नगर जिल्ह्यातून तर दोघांना शेजारी चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार गुंडांची नावे
1) तुषार हनुमंत पवार वय-19 वर्षरा. जांबवाडी ता.जामखेड जि. अहमदनगर
2) अक्षयकुमार अभिमान शिंदे वय-24 वर्षे रा. पोकळे वस्ती ता.जामखेड जि. अहमदनगर.
3) किरण ऊर्फ खंडया रावसाहेब काळे वय-28 वर्षे रा. मिलींदनगर ता. जामखेड
4) नितीन रोहीदासडोकडे वय-30 वर्षे रा. गोरोबा टॉकीज शेजारी ता. जामखेड
5) रमेश राजेंद्र काळे वय-38 वर्षे रा.गोरोबा टॉकीज जवळता. जामखेड
6) सिध्दांत ऊर्फ भाऊ राजु डाडर वय-46 वर्षे रा.आरोळेवस्ती ता.जामखेड
या तडीपार केलेल्या आरोपींपैकी कोणी आरोपी इसम तडीपार केलेल्या कार्यक्षेत्रात वावरत आल्यास जामखेड पोलीस स्टेशन फोन क्र. 02421-221033 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेकॉर्डवरील इतर 10 ते 12 गुंडांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने तडीपार प्रस्तावपाठवण्याचे काम सुरु आहे.