
ग्राहकांकडून नकळत अनेक परवानग्या घेताना ऑडियो रेकॉर्डिंगचीही परवानगी घेणारी जवळपास सहा धोकादायक ऍप्स गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून हटविली आहेत. या ऍप्समधून अनेक व्हायरसही युजर्सच्या मोबाईलमध्ये घुसण्याची शक्यता असल्यानेच ती हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुगलने मंगळवारी स्पष्ट केले. हटविण्यात आलेल्या सहा ऍप्सपैकी चार ऍप्स ‘व्हीपीएन’ वर्गातील आहेत. त्यात हॉटस्पॉट व्हीपीएन, फ्री व्हीपीएन मास्टर, सिक्युअर व्हीपीएन आणि सीएम सिक्योरिटी ऍपलॉक ऍण्टीव्हायरस या ऍप्सचा समावेश आहे. ही ऍप्स चीनमध्ये बनवण्यात आली असून त्यात प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिरातींचा भरणा होता, असेही गुगलने सांगितले आहे. ही ऍप्स फोनमध्ये असतील, तर ती लगेच रिमूव्ह करा असा सल्लाही गुगलने युजर्सना दिला आहे.


























































