वांगी शिवारात आढळला सहा फुटी अजगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

परभणीतील वांगी (सटवाई) शिवारात सहा फुटी अजगर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या अजगराला सर्पमित्रांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

वांगी सटवाई येथील साहेबराव जाधव यांच्या शेतात शेतमजुर गवत कापत होते. तेव्हा त्यांना अचानक एक भलामोठा अजगर तेथे दिसला. त्यानंतर मजुरांनी याबदद्ल जाधव यांना कळवले. नंतर सर्पमित्र रणजित कारेगांवकर यांना बोलावण्यात आले. अजगर शेतात असल्याचे कळताच सर्पमित्र ज्ञानेश डाके, वैभव सरोदे यांच्यासह कारेगांवकर यांनी धाव घेतली व अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडले.