सहा लाख भाविकांनी घेतले केदारनाथचे दर्शन

केदारनाथ बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून अवघ्या 26 दिवसांमध्ये 6 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. दररोज 25 हजारांहून अधिक भाविक या ठिकाणी पोहोचत आहेत. 2 मे 2025 रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी 30 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन केले होते. दररोज किमान 25 हजार भाविक या ठिकाणी पोहोचत आहेत. दर्शनासाठी भाविक पायी, घोडे-खेचर, कुंडी, हवाई मार्गाने या ठिकाणी पोहोचत आहेत.