उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये दोन अपघातात सहा जणांचा मृत्यू

502
accident

लॉकडाऊन जारी केल्यानंतर अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. मिळेल त्या वाहनाने किंवा पायीच अनेक मजूर आपल्या राज्यात परतत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा आणि त्याच्या बायकोचा अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये एक मजूर त्याची बायको आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 35 वर्षीय अशोक चौधरी हा व्यक्ती रिक्षातून दिल्लीहून बिहारमध्ये जात होता. तेव्हा लखनौ आग्रा महामार्गावर हे थांबले असता छोट्या टेम्पोने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक आणि त्याची बायको जागीच ठार झाली. त्यांचा मुलगा शौचासाठी बाजूला गेला होता म्हणून बचावला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच छोटा टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तर मध्य प्रदेशमध्ये एका मजुराच्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एक मजुर आपल्या बायको आणि मुलांसह महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये आपल्या घरी जात होता. तेव्हा टँकरने त्यांना जोरदार धडक दिली त्यात मजूर, त्याची बायको आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलं जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातात टँकर चालकही जखमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या