
सामना प्रतिनिधी । हिंगोली/वाशीम
हिंगोली ते वाशीम या राज्य मार्गावर कलगाव पाटीजवळील अन्नपूर्णा शाळेसमोर भरधाव वेगातील ट्रक व जीपची गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास जबर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जण जागीच ठार, दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या अपघातात जीपमधील गणेश हजारे, नरसिंग हजारे, सतीश मुरकुटे, अनिल चव्हाण यांच्यासह राजू धामणे, स्वप्नील इरतकर हे ठार झाले. तर सखाराम जिजेबा जाधव व मदन जयाजी चव्हाण हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. सर्वजण वाशीम येथील शुक्रवार पेठ भागातील रहिवासी आहेत.





























































