दिल्लीमध्ये रंगला स्लॅकलायनिंग इव्हेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्लॅकलायनिंग म्हणजे दोरीवरच्या कसरती. अनेकदा रस्त्यांवर काही मुले वा मोठी माणसे दोरीवरच्या कसरती करून पैसे मिळवताना दिसतात. दोन बाजूंना उंच काठ्यांना बांधलेल्या दोरीवरून एखाद्या चिमुरडीला चालताना बघून काळजाचा ठोका चुकतो. खरं तर हा एक साहसी क्रीडा प्रकार आहे. या स्लॅकलायनिंगचा इव्हेंट नुकताच दिल्लीत पार पडला.

जर्मन दूतावासाने नुकताच स्लॅकलाईन इव्हेंट लाल किल्ला परिसरात आयोजित केला होता. हिंदुस्थानच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हिंदुस्थानी आणि जर्मन स्लॅकलायनर्सनी सहभाग घेतला. जर्मनीचे प्रसिद्ध स्लॅकलायनर ऍलेक्झांडर शुल्झ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या महोत्सवात आठ हिंदुस्थानी स्लॅकलायनर सहभागी झाले होते. त्यांनी 30 मीटर हायलाईनची प्रात्यक्षिके दाखवली. सहसा या दोरीवरच्या कसरतींना प्रतिबंध केला जातो. मात्र त्यासाठी विशेष महोत्सवाचे आयोजन करून एक प्रकारे या साहसी क्रीडा प्रकाराला सन्मान दिल्याची भावना मुंबईचे स्लॅकलायनर आदर्श भट यांनी व्यक्त केली.