दिशा सलमानचं स्लो मोशन गाणं, युट्युबवर एक नंबर

सामना ऑनलाईन । मुंबई

भारत या सलामान खानच्या आगामी चित्रपटातील स्लो मोशन हे गाणे युट्युबरवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या इतक्या पसंतीस उतरले आहे की 24 तासांत या गाण्याला कोट्यवधी व्ह्युज मिळाले आहे. तसेच युट्युबर हे क्रमांक एकवर ट्रेंड होत आहे. या गाण्यात दिशा पाटनीच्या अदांनी प्रेक्षक घायाळ झाले आहेत.


स्लो मोशन हे गाणे 1964सालच्या रशियन सर्कसमधील आहे असे सलमान सुरूवातीला सांगतो. या गाण्यामुळे सुलतान चित्रपटातील लगे 440 ची आठवण येते.