लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेला बॉलिवूड अभिनेता रस्त्यावर विकतोय फळे

3735

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देश ठप्प आहे. चित्रपट सृष्टीतील सर्व कामकाज बंद असल्यामुळे अनेक छोटे कलाकार, पडद्यामागील कलाकारांचे वेतन बंद झाले आहे. त्यामुळे या कलाकारांचे मोठे हाल होत आहेत. यातीलच एक कलाकार आहे दिवाकर सोलंकी.

diwakar-solanki

दिवाकर सोलंकी यांनी आयुषमान खुरानासोबत ड्रीमगर्ल या चित्रपटात काम केलं आहे. तसेच रिषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट शर्माजी नमकीनमध्ये देखील ते काम करणार होते. मात्र अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. चित्रपटात काम करण्याआधी ते दिल्लीत फळं विकायचे. लॉकडाऊनमुळे दिवाकर पुन्हा एकदा फळविक्रीकडे वळले आहेत. ‘अभिनय हे माझे पहिले प्रेम आहे. मला लहानपणापासून अभिनेता व्हायचं होतं. मी उत्तर प्रदेशमधील माझ्या गावी चित्रपटगृहात इंटरव्हलमध्ये पापड विकायचो. सध्या मी फळं विकतोय. जर मी फळं विकली नाही तर माझ्या घराचं भाडं कोण भरणार, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न आहे’, असे दिवाकर सांगतात. दिवाकर सध्या दिल्लीतील मालवीय नगर व लाजपत नगर परिसरात फळ विकत आहेत. दिवाकर यांनी ड्रीमगर्ल या चित्रपटाबरोबरच तितली, सोंचरिया या चित्रपटातही काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या