
कोरोना काळात आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे. मागील दोन वर्षांमध्ये घरात व्हिडीओच्या माध्यमातून व्यायाम, योगसाधना, झुंबा, एरोबिक्स करणाऱयांची संख्या वाढली आहे. मात्र त्यातही अडचणी आहेत. म्हणूनच एका पंपनीने स्मार्ट मिरर तयार केलाय. हा आरसा चक्क व्यायाम कसा करावा ते सांगेल.
बदलत्या जीवनशैलीनुसार घरच्या घरी व्यायाम करणे सोपे व्हावे म्हणून पोर्टल या स्टार्टअपने ‘स्मार्ट मिरर’ तयार केलेय. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित आरसा व्यायामप्रेमींना त्यांच्या सोयीनुसार आणि घरातील कोणत्याही जागेत व्यायाम करण्यास मदत करतो. आरसा ग्राहकाला पर्सनल ट्रेनिंग देतो. त्यामध्ये 43 इंचाची स्क्रीन आहे. इंद्रनील गुप्ता यांनी हैदराबादमध्ये या स्टार्टअपची स्थापना केली आहे, तर विशाल चंदपेटा हे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत.
कसे चालते काम…
स्मार्ट मिररमध्ये गरजेनुसार आणि मूडनुसार अनेक व्यायाम, योगप्रकार, ध्यान आणि फिटनेसचे विविध प्रकार आहेत. त्यात व्यायामाचा प्रकार निवडल्यावर व्हिडीओ सुरू होतो आणि तो व्यायाम नेमका कसा करायचा, ते सांगतो. ऑनलाइन मार्गदर्शनही केले जाते. पोर्टलमध्ये स्मार्ट सेन्सर आहेत. न्युट्रिशियन कोचिंगच्या मागणीनुसार शेकडो वर्कआऊट त्यामध्ये आहेत. तसेच या उपकरणात बायो सेन्सर्स आहेत. जे व्यायाम करणाऱ्याचा रक्तदाब, ग्लुकोज आणि ईसीजी अशा अनेक बाबी तपासू शकते.



























































