स्मार्टफोनच्या निळय़ा प्रकाशामुळे अकाली म्हातारपण

दिवे घालवल्यावर स्मार्टफोन, संगणक किंवा लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या डिव्हाईसमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे अकाली म्हातारपण येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. निळ्या प्रकाशामुळे वयावर गंभीर परिणाम होत असून जास्त वेळ या प्रकाशाच्या सान्निध्यात घालविल्यामुळे झोप न येण्यासारखी समस्या उद्भवण्याचा धोका आहे.
‘एजिंग ऍण्ड मॅकेनिझ्म ऑफ डिझीझ जर्नल’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार ‘एलईडी’तून (लाईट एमिटिंग डायोड) निघणारा निळा प्रकाश थेट मेंदूतील पेशी आणि डोळ्यांतील बुब्बुळांचे नुकसान करतो. विविध डिव्हाईसमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशाचा परिणाम पाहण्यासाठी संशोधकांनी काही मधमाश्यांना 12 तास निळ्या प्रकाशाच्या सान्निध्यात ठेवले. कालांतराने या मधमाश्यांचे वय वेगाने वाढल्याचे निदर्शनास आले.
डोळे आणि मेंदूचे नुकसान
ज्या मधमाश्यांवर हे संशोधन करण्यात आले त्या मधमाश्यांचे डोळे आणि मेंदूच्या पेशींचे निळ्या प्रकाशामुळे नुकसान झाले. या मधमाश्यांची हालचाल करण्याची क्षमतादेखील कमी झाली. तर काही माश्यांचे ब्रेन डेडदेखील झाले. यावरून असे स्पष्ट झाले की निळा प्रकाश डोळ्यांवर कसाही पडला तर त्यामुळे नुकसानच होते.
मधमाश्यांचे वय वेगाने वाढले
संशोधनातील मुख्य संशोधक प्रा.जागा गियेबुल्तोविझ यांनी सांगितले, ‘मधमाश्यांचे वय वेगाने वाढत असल्याचे पाहून सुरुवातीला आम्हाला आश्चर्य वाटले. नैसर्गिक प्रकाश शरीराला आवश्यक असतो. यामुळे मेंदूच्या हालचाली, हॉर्मोन्सची निर्मिती चांगली होते. मात्र आर्टिफिशिअल प्रकाशामुळे मेंदू आणि झोपेच्या समस्या उद्भवतात, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या