WOW! दोन्ही बाजूने स्क्रीन असणारा स्मार्टफोन होणार लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्य

स्मार्टफोनजे जग दिवसेंदिवस बदलत असून दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आता अनेक कंपन्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची निर्मिती करत आहेत. आतापर्यंत तुम्ही 108 मेगापिक्सल कॅमेरा वाला स्मार्टफोन तसेच फोल्डेबल स्मार्टफोन पाहिला असले. मात्र चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Huawei लवकरच ड्यूअल स्क्रीनवाला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे फ्रंटबाजून आणि बॅकसाईडने अर्थात मागच्या बाजूनेही याला स्क्रीन असणार आहे.

Huawei कंपनीने नुकतेच ड्यूअल स्क्रीन स्मार्टफोनसाठी पेटंट घेतले आहे. कंपनीने या स्मार्टफोनचा फोटोही आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमावर शेअर केला आहे. कंपनी या स्मार्टफोनला दोन्ही बाजून स्क्रीन तर देतच आहे, शिवाय दोन्ही बाजून रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे.

huawei

नवीन तंत्रज्ञान

Huawei कंपनीने या स्मार्टफोनचे पेटंट घेतले असून याच्या मदतीने HoiINDI डिझायनरने हाय क्वालिटी 3डी इमेज तयार केली आहे. नवीन तंत्रज्ञानासह हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे. या फोनमध्ये दोन्ही बाजूने कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

huawei-dual-screen-smartpho

काय असणार खास?

कंपनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये रियर डिस्प्ले पॅनलवर तारीख, वेळ, वातावरण, नोटिफिकेशन, बॅटरी पावर आणि व्यूफाइंडर या गोष्टी दिसत आहेत. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच याची स्क्रीन खास तंत्रज्ञान वापरून तयार केली जाणार असून बॅटरी बॅकअप देखील मजबूत दिला जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या