
स्मार्टफोनचा वापर करून व्हिडीओ बघणे आपल्याला आवडते. काहींना तर त्याची सवय जडते. मात्र सतत व्हिडीओ बघणे युजर्सना चांगले महागात पडू शकते. व्हिडीओ बघणाऱया यूजर्सचा मोबाईल डेटा असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या स्ट्रिमिंगचा जमाना आहे. अनेक कंपन्या आपली स्ट्रिमिंग सर्व्हिस घेऊन मार्केटमध्ये आल्या आहेत. स्ट्रिमिंग सर्व्हिस वापरताना युजर्सचे लक्ष ऑन क्रिन ऍक्शनवर असते. व्हिडीओ बघताना जाहिराती येतात. जाहिरातीदरम्यान जे युजर्स त्या स्किप करीत नाहीत त्या यूजर्सचा ई-मेल ऍड्रेस, डिव्हाईसचा सीरियल नंबर कलेक्ट करून डिस्ट्रिब्युट केल्याची माहिती टर फॉर डिजिटल डेमोक्रेसीचे कार्यकारी संचालक जेफ चेस्टर यांनी दिली.

























































