एका सेकंदात होणार मोबाईल फूल चार्ज, ‘ही’ कंपनी करतेय यावर काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिकडे स्मार्टफोनच्या फिचर्सबरोबर फास्ट चार्जिंगही महत्वाची असते. त्यामुळे फोन खरेदी करताना फोन कितीवेळात चार्ज होतो तेही महत्वाचे असते. पण आता एका सेकंदात फोन चार्ज होणार आहे. कारण ओपो सध्या एका तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे भविष्यात पाहायला मिळणार आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

स्मार्टफोनला चार्ज व्हायला किती वेळ लागायला हवा. मार्केटमध्ये असे अनेक फोन आहेत जे 5 मिनीटाच्या चार्जिंगनंतर पाच तास चालतात. या हॅण्डसेटला पूर्ण चार्ज होण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागतो. तसेच अशाही तंत्रज्ञानावर काम सुरु आहे, जो अवघ्या सेकंदात फोनला फूल चार्ज करणार आहे. ओप्पोच्या चार्जिंग तंत्रज्ञान हेडच्या म्हणण्यानुसार, भविष्यात आमचे स्मार्टफोन अवघ्या सेकंदात चार्ज होऊ शकतात. 0-100 टक्के फोन चार्ज व्हायला केवळ एक सेकंद लागणार आहे. ओप्पोच्या एडवर्ड टियान नी याबाबत एका मुलाखती दरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही अशा टप्प्यावर आहोत जिथे स्मार्टफोन फक्त 15 मिनिटांत चार्ज होऊ शकतो. जर 150W चा चार्जर असेल तर 15 मिनिटांत फोन सहज चार्ज करू शकता. Oppo ची उपकंपनी Realme चा GT Neo 3 फोन फक्त 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज करू शकता. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी संख्या आवाक्याबाहेर होती. आता आपण जिथे आहोत तिथून असे दिसते की चार्जिंग तंत्रज्ञानाची मर्यादा नाही.

एडवर्ड टियान पुढे म्हणाले, ‘फास्ट चार्जिंगचे तांत्रिक अभियंता म्हणून माझे काम वेळेची मर्यादा मोडणे आहे. त्यामुळे सध्या आम्ही फक्त एका सेकंदात फोन चार्ज कसा होईल यावर काम सुरु आहे. हे लगेच शक्य नाही तसेच ओपो हे लगेच काम करणार नाही. कंपनी याकडे एक शक्यता म्हणून पाहते. यासाठी कंपनीला यावर बरेच काम करावे लागणार आहे. एडवर्ड टियानने कबूल केले की इथपर्यंत पोहोचणे सोपे नाही. त्यांनी सांगितले की, फास्ट चार्जिंगचा चार्जिग स्पीड वाढवणे हे आव्हान नाही तर युजर्संना चार्जिंगचा चांगला अनुभव देणे आव्हान आहे. यामध्ये सेफ्टी, चार्जिंग टेंपरेचर, बॅटरी सेल डेन्सिटी, बॅटरी लाइफ स्पॅम अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.