
टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू स्मृती मनधाना व पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांचे लग्न मोडल्याचे जाहीर केले आहे. लग्न तुटल्याचे जाहीर केल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे.
स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशी तिचे वडील आजारी पडल्याने तिचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान हे लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलचे एका मुलीसोबतचे चॅट व्हायरल झाले असून पलाशने स्मृतीला धोका दिल्याने हे लग्न मोडल्याचे बोलले जात आहे.
रविवारी स्मृती व पलाश दोघांनीही पोस्ट शेअर करत त्यांचे लग्न मोडल्याचे जाहीर केले आहे. स्मृतीने एक पोस्ट टाकत तिच्या लग्नाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. ”मी माझ्या वैयक्तिक गोष्टींची सार्वजनिक आयुष्यात चर्चा करत नाही. पण एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती म्हणजे माझं लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल, असे स्मृतीने म्हटले आहे.


























































