मी एक सरळ साधी व्यक्ती, अतिविचार करून मी … लग्न मोडल्यानंतर स्मृती मनधाना पहिल्यांदाच बोलली

टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मनधाना हिने पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्याचे जाहीर केल्यानंतर ती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी बोलताना स्मृतीने ”मी एक साधी व्यक्ती आहे, मला वाटत नाही मी क्रिकेटपेक्षा जास्त प्रेम कुणावर करते” असे सांगितले आहे.

स्मृती ही बुधवारी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात त्या दोघींची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत स्मृतीला ‘तुझ्या आयुष्यात एवढं सगळं सुरू आहे ते तु कसं मॅनेज करत आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी स्मृती म्हणाली, ”मला वाटत नाही मी क्रिकेटपेक्षा जास्त प्रेम कुणावर करते. टीम इंडियाची जर्सी हिच माझी प्रेरणा आहे. हिच जर्सी तुम्हाला इतर सर्व प्रॉब्लेम्स बाजूला ठेवायची प्रेरणा देते”

पुढे ती म्हणाली की, ”मी कायम एक साधी व्यक्ती राहिली आहे. मी अतिविचार करून माझं आयुष्य अधिक क्लिष्ट करत नाही”, असेही तिने सांगितले.