पाहा व्हिडीओ: लोकलच्या पंख्याला लटकला साप, प्रवाशांना लागली धाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेतूल बिघाड, तर कधी ओव्हरहेड वायर तुटणं, कधी रेल्वे ट्रॅकला तडा अशा वेगवेगळ्या कारणांनी नेहमी विस्कळीत होताना आपण बघत असतो. मात्र आज मध्य रेल्वे अडली ती भलत्यात कारणामुळे. टिटवाळा-सीएसएमटी या धावत्या लोकलमध्ये चक्क साप आढळला आणि प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. त्यामुळे ठाणे स्थानकात चेन ओढून गाडी थांबवली.

गुरुवारी सकाळी ८.३३ वाजताच्या टिटवाळाहून सीएसएमटीला निघालेली लोकल ठाणे स्थानकात आल्यानंतर एका प्रवाशाला लोकलच्या पंख्यात हिरव्या रंगाचा साप असल्याचं आढळून आलं आणि डब्यात गोंधळ उडाला. यावेळी प्रवाशांनी खबरदारी म्हणून डब्यातील पंखे आणि दिवे बंद केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी अखेर डब्यातील सापाला बाहेर काढले. त्या नंतर लोकल पुढे रवाना झाली. ठाणे स्थानकात काही वेळ लोकल थांबवण्यात आली, त्यामुळे मध्यरेल्वेची अप मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.