डांबरात अडकलेल्या नागाला सर्पमित्राने दिले जीवदान!

3019

डांबरात अडकलेल्या विषारी नागाला जीवदान देण्याचे काम चिरनेर येथील सर्पमित्र आणि रायगड भूषण जयवंत ठाकूर यांनी केले. सोमवार रोजी चिरनेर येथिल पी. पी. खारपाटील गोदामात एक विषारी साप अडकला असल्याचा फोन जयवंत यांना आला. त्यांनी आपला सहकारी राजेंद्र पाटील यांच्या समवेत जावून डांबरात अडकलेल्या विषारी सापाला सोडविण्याचे काम केले.

हा नाग डांबरामध्ये पूर्णपणे चिकटला असल्यामुळे त्याला जीवंत कसा सोडवणार असा प्रश्न लोकांना पडला होता. मात्र सर्पमित्र जयवंत यांनी या नागाला कोणतीही इजा न करता सूखरूप सोडवले. हा नाग डांबरात संपूर्णपणे माखला होता. थोडीशी नाकपूडी बाहेर असल्यामुळे त्याचा श्वासोश्वास सूरू होता. रॉकेल किंवा इतर केमिकल लावून डांबर काढण्याचा प्रयत्न केला तर सापाला इजा होण्याची शक्यता होती. मात्र जयवत यांनी सर्वप्रथम सापाचे डोके आणि नाक मोकळे करून त्याचा श्वासोश्वास मोकळा केला. त्यामुळे साप चावण्याची शक्यता वाढली होती. तरी देखील अलगद हाताने त्या नागाला संपूर्ण डांबरातून मुक्त केले.

snake1

साधारण साडेतिन फुटांचा हा नाग आहे. काही दिवसांनी कात टाकल्यानंतर त्याच्या शरिरावरचे संपूर्ण डांबर निघून जाईल असे जयवंत ठाकूर यांनी सांगितले. दोन-तीन दिवसात वनविभागाच्या अधिकाऱ्यासमोर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल असे जयवंत ठाकूर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या