सातव्या वेतन आयोगासाठी एसएनडीटीच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निदर्शने

सामना प्रतिनिधी । मुंबई

सातव्या वेतन आयोगाची सुधारित संरचना लागू करा, या मागणीसाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱयांनी काळय़ा फिती लावून जुहू आवारातील विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार निदर्शने केली. मागण्या पूर्ण न झाल्यास जुलैपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अकृषी विद्यापीठीय आणि अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाचा सुधारित संरचना लागू कराव्या, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे आणि अन्य 25 मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाद्वारे महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले होते. या मागण्यांची दखल घेतली न घेतल्यामुळे 10 ते 12 जूनला कर्मचाऱयांनी काळय़ा फिती लावून आंदोलन केले आणि आंदोलनाच्या तिसऱया टप्प्यात 13 जूनपासून काळी फीत लावून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने सुरू आहेत.