चांगल्या घरातील महिलेला चोरी करताना पकडले, लॉकडाऊनमध्ये गेली होती नोकरी

4444
pune-police

पुण्यातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर दागिन्यांच्या दुकानात चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्नेहल पाटील असं या महिलेचं नाव असून तिची कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. स्नेहल ही एका खासगी कंपनीमध्ये समुपदेशक म्हणून काम करत होती. पुण्यातील चंदन नगर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाबळेश्वरमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या पथकावर हल्ला, 125 जणांवर गुन्हा दाखल

स्नेहलविरोधात चोरीचा हा पहिला गुन्हा नाहीये. तिच्यावर 2015 आणि 2018 साली देखील चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीप्रकरणात तिचे नाव आल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले आहेत. चंदन नगर भागातील राहुल लोळगे यांनी त्यांच्या दुकानात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही अटक केली आहे. स्नेहल ही कोरेगाव पार्कातील एका सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहात आहे. ती इथे तिच्या प्रियकरासोबत राहात असून तिचा प्रियकर हा चित्रपट निर्माता असल्याचे कळाले आहे. स्नेहलच्या अटकेबाबत तिच्या प्रियकराला काहीच माहिती नव्हते. तो मध्य प्रदेशात त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला आहे.

खेकडे पकडायला आलेल्यांनी सुरक्षा रक्षकाला जाळले, तरुणाचा मृत्यू

28 जुलै रोजी स्नेहल लोळगे यांच्या दुकानात गेली होती. कानातले दाखव असं सांगत तिने दुकानदाराला गुंतवून ठेवण्यास सुरुवात केली. आणकी दाखवा…आणखी दाखवा असं सांगत तिने दुकानदाराला गुंतवून ठेवलं होतं. तो दागिने दाखवण्यात गुंतलेला असताना स्नेहलने 60 हजार रुपयांचे कानातले चोरले. दुकान बंद करत असताना मालाची मोजणी सुरू असताना कानातले चोरीला गेल्याचे कळाले. यामुले लोळगे यांनी पोलिसांत तक्रार केली.

स्नेहल दुकानात आली होती तेव्हा तिने चेहरा स्कार्फने झाकलेला होता. त्यामुळे सीसीटीव्हीमधून त्यांना तिची ओळख पटू शकली नव्हती. मात्र स्नेहल ज्या रिक्षातून आली होती, ती रिक्षा पोलिसांनी शोधून काढली. स्नेहल या रिक्षातून ३ तास भटकत होती, जेणेकरून पोलिसांना तिचा माग काढता येणार नाही. मात्र अखेर पोलीस तिच्यापर्यंत पोहोचलेच. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतची बातमी दिली असून त्यात म्हटलंय की पोलीस स्नेहलविरोधात आणखी कुठे चोरी केली आहे का ? याचाही शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या