देवरुखमध्ये रविवारी बाजारपेठेत गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

266

देवरुख बाजारपेठेत रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लॉकडाऊनमध्ये काही नियम पाळून शिथीलता देण्यात आली आहे. मात्र, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळण्यात आले नाही. त्यामुळे शहरात कोरोनाच्या फैलावाची भीती व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी व प्रांतानी दिलेल्या आदेशानुसार सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बाजरात एकाचवेळी गरप्दी होत आहे. व्यापारी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विक्री करत आहेत. मात्र, ग्राहक कोणतेच नियम पाळत नसल्याने बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या