अभिज्ञा म्हणतेय, चुकीला माफी नाही! ट्रोलर्सना दिला इशारा

1130

सोशल मीडियावर फोटोवरून किंवा कपडय़ांववरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशा ट्रोलर्सच्या चुकीला आता माफी नाही, असा इशाराच ’खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने सोशल मिडियावरून दिला आहे.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये अभिज्ञा म्हणाली, ’आता पुरे झालं. दिवसेंदिवस सायबर क्राइमची प्रकरणे वाढतायत. विविध कारणांसाठी मला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. यापुढे माझ्या पोस्टवर येणाऱया प्रत्येक खोटय़ा, अश्लील, बेजबाबदार कमेंटविरोधात मी कायदेशीर तक्रार करणार आहे. यामध्ये स्पॅममध्ये येणाऱ्या मेसेजेसचाही समावेश असेल.’असे ती म्हणाली. सेलिब्रिटी आहोत म्हणून आम्हाला वाट्टेल ते बोलले जातेय. खरी परिस्थिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न लोक करत नाहीत. लोकांच्या हिशोबाने नाही वागलो तर आम्हाला बेजबाबदार किंवा कलाकार असल्याचा माज आहे असे बोलले जाते.

सेलिब्रिटी होण्याआधी मी एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्या खासगी किंवा व्यावसायिक आयुष्याशी संबंधित निर्णयांवर टिप्पणीचा कोणाला अधिकार नाही. जे वाईट टिप्पणी करत नाहीत त्यांना विनंती आणि जे करतात त्यांना यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही.’ असा इशाराच तिने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या