सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी निलंग्यात गुन्हा दाखल

1963

निलंगा सध्या कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातले असून काही लोकांकडून फेसबुक व्हाट्सअप वरती आक्षेपार्ह आणि चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवण्यात येत आहेत. याची दखल घेऊन निलंगा पोलीस आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय फेसबुक वॉट्सअप वरती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण विविध प्रकारच्या अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. शिवाय कोणतीही माहिती परिपूर्ण नसताना अफवा पसरवून तेढ निर्माण करणाऱ्याना सायबर सेलकडून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलिस अधिक्षक राजेंद्र माने यांनी दोन दिवासापूर्वी दिले होते.

असा प्रकार निलंगा शहरात घडला असून फेसबुक व व्हाट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल मयूर आंतरेड्डी (रा. पेठ निलंगा) व हंसराज शिंदे (रा.पांचाळ कॉलनी निलंगा) यांच्यावर निलंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयाद्वारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर टाकू नयेत, पोस्ट टाकणाऱ्यावर व ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिस निरीक्षक अनिल चोरमले यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या