नगर जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय

366

करोना व्हायरस विषय सुरू झाल्यानंतर आता नगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील चित्रपट गृह, मॉल, व्यायाम शाळा, तसेच जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बजावले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव आता सर्वत्र सुरू झाला आहे. जिल्हा प्रशासनात खबरदारी म्हणून आता वेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे. काल अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली होती. ज्यामध्ये सर्व जिल्ह्याचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला होता.

रविवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रांमध्ये असणाऱ्या शाळा, मॉल, तसेच जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत आदेश त्यांनी रविवारी बजावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या