
साडी नेसलेली एक चिमुकली मुलगी घरात मस्तपैकी इकडून तिकडे पळताना चालताना दिसते आणि ते दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चिमुरडीने चक्क साडी नेसली आहे आणि घरात मोठय़ा आत्मविश्वासाने फिरत आहे. साडी नेसूनसुद्धा ती अजिबात अडखळत नाही, उलट आनंदात धावत-पळत घरात सगळ्यांना दाखवत आहे. तिचा निरागस चेहरा, गोड बोबडं बोलणं आणि बेधडक चाल सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे. ही गोड चिमुकली नेटकऱयांना खूप आवडली आहे. ‘लेक म्हणजे घराची शान’ अशा कमेंट्स नेटिजन्स करत आहेत. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @gunjansingh 6902 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.




























































