
सामना प्रतिनिधी । आंजर्ले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वनिता मधुकर पाटील यांचे नुकतेच आंजर्ले (ता. रत्नागिरी) येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. दै. ‘सामना’च्या आर्टिस्ट विभागातील राजन पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार असून दशक्रिया विधी गुरुवार 27 सप्टेंबर रोजी आंजर्ले येथे होणार आहे.





























































