कचरा विल्हेवाट, रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करात 15 टक्के सूट

389

ओला-सुक्या कचऱयाचे वर्गीकरण, कचऱयाची विल्हेवाट आणि सोसायटीच्या आवारात रेन हार्वेस्टिंग करणाऱया सोसायटय़ांना मालमत्ता करात 15 टक्के सूट मिळणार आहे. पालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला स्थायी समितीत मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो सोसायटय़ांना दिलासा मिळणार आहे.

पालिकेने सोसायटय़ांना ओला क सुका कचऱयाचे कर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी गृहनिर्माण संस्था, कसाहती आदींना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. तरीही मुंबईत कचऱयाचे कर्गीकरण करण्याचे काम योग्य प्रकारे होत नाही. शिवाय रेन हार्वेस्टिंगही केले जात नाही. त्यामुळे पालिकेने पर्यावरणदृष्टय़ा या महत्त्वपूर्ण उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला. याबाबत आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्देशानुसार कर निर्धारण व संकलन विभागाने स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडला. य।़बाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मांडण्यात आला असता बहुमताने मंजूर झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केले.

अशी मिळणार 15 टक्के सूट
– ओला आणि सुका कचऱयाचे वर्गीकरण करतील, ओल्या कचऱयाचे रूपांतर खतात करतील आणि ओल्या कचऱयाचे रूपांतर ‘शून्या’त करतील त्यांना मालमत्ता करात 5 टक्के सवलत.

– ज्या सोसायटय़ा कचऱयाचे वर्गीकरण करून सुक्या कचऱयाचा पुनर्वापर करणाऱया संस्थेला सोपवून विल्हेवाट लावतील, जेणेकरून त्या कचऱयाचे प्रमाण 50 टक्क्कयांपर्यंत खाली येईल. अशा उपक्रमासाठी 5 टक्के सवलत.

– ज्या सोसायटय़ा त्यांच्या आवारातील सांडपाण्याचा पुनर्वापर स्वच्छतागृहासाठी करतील आणि सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवतील अशा सोसायटय़ांना 5 टक्के सवलत.

आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक
मुंबई महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेल्या निर्णयाचे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. यामुळे सोसायटय़ांना कचरा वर्गीकरण आणि रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छता मोहिमेला बळ मिळण्यासाठी संपूर्ण देशात असा उपक्रम राबवला पाहिजे, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. स्थायी समितीत या निर्णयाला मंजुरी मिळाल्यामुळे त्यांनी अभिनंदनही केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या