सोफिया ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या सोफिया केनिनने किताबी लढतीत दोन वेळच्या ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन असलेल्या स्पेनच्या गॅर्बिन मुगुरुजा हिचा पराभव करून ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. 21 वर्षीय सोफियाचे कारकीर्दीतील हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम जेतेपद होय. मारिया शारापोव्हानंतर ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकणारी सोफिया सर्वात युवा टेनिसपटू ठरली. शारापोव्हाने 2008 साली वयाच्या 20 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. 14 वे मानांकन असलेली सोफिया केनिनने 2 तास 3 मिनिटांपर्यंत रंगलेल्या जेतेपदाच्या लढतीत गॅर्बिन मुगुरुजा हिचा 4-6, 6-2, 6-2 असा पाडाव करून ऐतिहासिक कामगिरी केली.

सपोर्ट स्टाफ आणि वडील सतत माझ्या सोबत होते या सर्वांचे धन्यवाद. आईने घरी बसून माझ्या लढती बघितल्या. तिच्या पाठिंब्यामुळेच मी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदापर्यंतचा प्रवास करू शकले. – सोफिया केनिन