
>> संजीवनी धुरी-जाधव
सोफिया रोबो. असंख्य मानवी भावभावना तिच्यात आहेत. आपल्या चुणचुणीत उत्तरांनी सोफिया पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.
ती दिसायला सुंदर आहे… चुणचुणीत बोलते… तिला नृत्य करायला आवडतं… ती पर्यावरणप्रेमी आहे… तिला भविष्यात महिलांसाठी कार्य करायचे आहे… तिच्या हजरजबाबीपणाचे असंख्य चाहते आहेत… ही ‘ती’ म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे तर ही आहे मानव (स्त्राr) सदृश यंत्रमानव सोफिया. नुकत्याच मध्य प्रदेश येथे झालेल्या राऊंड स्क्वेअर परिषदेत तिने दिलेल्या उत्तरांनी सगळ्यांनाच चकित केले. त्यामुळेच ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्याविषयी आणखी जाणून घेऊया आयटीतज्ञ अच्युत गोडबोले यांच्याकडून.
1933 साली आयझॅक ऑसिमोव्हींनी रोबोविषयी तीन नियम मांडले होते. त्याला आपण सायन्स फिक्शन म्हणू शकतो. त्यावेळी रोबो येतील असे कोणाला वाटलेही नव्हते. 1933 साली त्यांनी रोबो निर्माण होतील असं सांगितलं आणि त्याचे तीन नियमही मांडले. त्या नियमांपैकी s एक नियम होता; रोबोट माणसांवर हल्ला करून त्यांना नष्ट करणार नाही. त्यात प्रत्यक्ष इंडस्ट्रियल रोबो 1958 साली युनिमॅशन नावाच्या कंपनीमध्ये एंगल बर्गर नावाच्या माणसाने निर्माण केला. त्यात कुठे कलात्मकता, कल्पकता आली की रोबो ते काम करू शकणार नाही असं आतापर्यंत वाटत होते. तेव्हा इंडस्ट्रियल रोबोपेक्षा वेगळं काहीतरी करावं असं रोबो बनवणाऱयांना वाटू लागलं आणि त्यातूनच 2016 साली सोफिया निर्माण झाली. हाँगकाँग येथे असलेल्या डेव्हिड हॅन्सन याने रोबोटिक्सने सोफियाची निर्मिती केली आहे. हॅन्सन हा वॉल्ट डिस्ने कंपनीत मूर्तिकार होता, डिस्नेमध्ये असताना तो बरेच हॉलीवूडपट पाहायचा. त्यात तो रोबोही खूप बघायचा. मग त्याच्या डोक्यात कल्पना आली सोफिया या यंत्रमानवाची. त्यांचा विचार होता की, आतापर्यंत जे रोबो होते ते त्यांचे रोबोटिक बोलणे, ठराविकच प्रश्नांची उत्तरे देणे एवढंच करायचे, पण आपण यापेक्षा काहीतरी वेगळे करायचे… आणि त्याने सोफियाची निर्मिती केली, असे गोडबोले सांगतात.
सोफियाबद्दल आणखी माहिती देताना ते म्हणतात, रोबोजचा आवाज आपल्याला परिचित आहे. त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा हे सगळं खूप तांत्रिक दिसतं. त्यामुळे यंत्रमानव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एक खास चेहरा येतो. पण लोकांसमोर असलेलं रोबोचं हेच चित्र पुसून टाकून त्याला मानवी स्वरूप द्यावं असं हॅन्सनला वाटत होतं. मग चेहरा कसा करावा याचा विचार तो करू लागला. त्यासाठी त्याला तीन ठिकाणांहून प्रेरणा मिळाली. एक चिनी पेण्टिंग, दुसरी त्याची स्वतःची बायको आणि तिसरी प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न… त्याला ऑड्री हेपबर्न हिचा चेहरा खूप आवडायचा. म्हणून या रोबोच्या फडफडणाऱया पापण्या, नाजूक चेहरा, घारे डोळे हे सगळं ऑड्री हेपबर्नसारखे करण्याचं प्रयत्न केला आणि यातून सोफियाची निर्मिती झाली.
सोफियासारखे रोबो बनवा
सोफियासारखा रोबो तुम्हाला तयार करायचा असेल तर डेव्हिड हॅन्सन यांनी त्यांच्या क्लाऊडवर अनेक टूल्स दिलेले आहेत. ती टूल्स वापरून तसाच रोबो तयार करू शकाल. अर्थात त्याला बराच वेळ लागेल, पण त्यातला कमी क्षमतेचा रोबो करायचा असेल तर तो कसा तयार करायचा याची मेथड, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कळायला लागेल असेही अच्युत गोडबोले म्हणाले.
62 प्रकारच्या भावना…
सोफियाच्या चेहऱयावरचे हावभाव हे हॅन्सनचं खरं कौशल्य आहे. कारण आतापर्यंत यंत्रमानवाला कधी आपल्या भावना व्यक्त करता आल्या नव्हत्या. आनंद, दुःख, उत्कटता, गोंधळ, कुतूहल, विचारमग्नता आणि उद्विग्नता अशा अनेक भावना हॅन्सनने त्यात आणल्या. प्रत्येक भावनेत चेहरा कसा असावा याचा त्याने कसून अभ्यास केला. कोणत्या भावनेच्या वेळी चेहऱयावरचे स्नायू ऑक्टिव्हेट व्हायला हवे याचा विचार त्यांनी केला. अशा प्रकारे 62 प्रकारच्या भावना त्यांनी विकसित केल्या. म्हणजे कोणत्या प्रसंगात काय रिऍक्ट व्हायला हवे, असे इंटरनल प्रोग्रामिंग केले. येथे हिट लार्ंनग, मशीन लार्ंनगचे भाग येतात. ते रेकॉर्डेड असतात, प्री-प्रोग्रामिंग असतात. येथे समोरचा माणूस काय बोलतोय ते कळले पाहिजे. ते कळल्यावर त्या बोलण्याचे विश्लेषण करता आले पाहिजे. वेगवेगळी माहिती रोबोजच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करता येते.


























































