तबल्याची  थाप

56

तबल्याची प्रचंड आवड, मेहनत घेण्याची प्रखर जिद्द आणि श्रेष्ठांचं मार्गदर्शन… या सगळ्याच्या साथीने सोहम परळे तरुण पिढीत आगळावेगळा ठरतोय.

लहानपणी मुलं जेथे खेळणी घेऊन खेळतात, त्या वयात कुर्ला येथे राहणारा सोहम परळे तबल्याशी खेळायला लागला. तो लहान होता तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याला एक ढोलकं दिलं होतं. ते वाजवत वाजवत कधीतरी त्याला ताल आणि सुरांचा नाद लागला. त्यातही आता तो तालावर जास्त भर देतोय. अंकुश दीक्षित गुरुजींकडून तबलावादनाचे पहिले धडे गिरवणारा सोहम आता त्यात पारंगत झाला आहे. सध्या तो उदय जोशी यांच्याकडे दिल्ली घराण्यातील तबलावादन शिकतोय. शिकणं कधीच संपत नाही हे त्याला मनोमन पटलंय. म्हणूनच तर सतत पुढे जाण्याची जिद्द त्याला शिकत राहायला सांगतेय. त्याने खास कुणाचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवलेला नाही. कारण त्याला ‘दुसरा झाकीर हुसेन’ बनण्यापेक्षा ‘पहिला सोहम परळे’ बनायचंय. आता त्याची वाटचाल तबला नवाझ व्हायच्या मार्गावर सुरू आहे.

तो म्हणतो, ‘मला रोजचा 6 तास रियाज करणे गरजेचे आहे. सुरुकातीला थोडा त्रास होत होता 6 तास रियाज करण्याचा. पण आता मी स्वतःहून 8 तास रियाज करायला लागलोय.’ पुढे तो म्हणतो, शाळेत असताना अभ्यासामुळे तबल्याकडे लक्ष देता आले नाही. दहावी झाल्यावर खूप फिरू, खेळू, गावी जाऊ, मजा करू… असं ठरवलं होतं, पण त्यातलं काही झालं नाही. कारण सुट्टीतही रोज सकाळी न चुकता विलेपार्ले येथे तो रियाज करायला जायचा. सोहमच्या घरच्यांनाही संगीताची आवड होतीच. म्हणून सोहमला पुरेपूर प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच घरी तो रियाजाला बसला तर बस्स कर आता… असं कुणीच बोललं नाही. पुढे येण्यासाठी माझे आई-बाबा आणि गुरूजी सपोर्ट करतात असं तो मनापासून सांगतो. आतापर्यंत त्याला पं. किष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार, आमद प्रतिष्ठान, उस्ताद अमीर हुसेन खांसाहेब, मधुकंस गंधर्क महाकिद्यालय, पं. राम मराठे पुरस्कार, संगीत मिलॉन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलंय.

आपली प्रतिक्रिया द्या