सोलापुरात 20 लाखांचा गुटखा जप्त; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरातील बॅटको ट्रान्सपोर्ट कंपनीवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 20 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अहमद मेहमूद खान, अब्दुल सत्तार शेख, उजेब समीर शेख (सर्व रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांना चिराग अलीजवळील बॅटको ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये अवैधरीत्या प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यावरून तेथे छापा घातला असता प्रतिबंधित 20 लाख रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी तो जप्त करून अहमद खान, अब्दुल शेख, उजेब शेख यांना अटक केली असून, जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साळुंके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.