सात जिल्हय़ांतील 39 दुचाकी जप्त, सोलापूर पोलिसांची पंढरपुरात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक गुन्हे शाखा आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून पंढरपुरातून एका दुचाकीचोराला जेरबंद करण्यात यश मिळविले. या चोराकडून तब्बल 39 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी सात जिल्ह्यांतून चोरल्याचे उघड झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात दुचाकीचोरीचे गुन्हे वाढले होते. याबाबत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे पथक चोरटय़ाच्या मागावर होते. पोलीस पथकाने पंढरपुरातून एकाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तब्बल 39 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने या दुचाकी सोलापूर, पुणे, सातारा, नगर, कोल्हापूर, बीड जिल्ह्यांतून चोरल्याचे उघड झाले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्की सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराक पाटील यांच्या नेतृत्काखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, राजेश गायककाड, दिलीप राऊत, श्रीकांत गायककाड, किजयकुमार भरले, सलीम बागकान, हरिदास पांढरे, रकि माने, सचिन गायककाड, केशक पकार यांनी ही कामगिरी केली.