सोलापूरात दोन संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल

919

सांगोला तालुक्यातील कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीयरूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. देशात संचारबंदी लागू केली असली तरी अद्याप नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत.

शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार योगेश खरमाटे यांनी केले आहे.

सांगोला तालुक्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पुण्याहून आलेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांना आज पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहेत. सध्या तालुक्यात एक हजार 854 नागरिक अन्य ठिकाणाहून आले असून यापैकी तिघांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आतापर्यंत अन्य देशातून 11, अन्य राज्यातून 107 तर अन्य जिल्ह्यातून सहा हजार 447 नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी तिघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आज दोन संशयित रुग्णांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या