सोलापूरात कोरोनाचे 31 रुग्ण आढळले, एकूण आकडा तीनशेच्या पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या आज 31 नं वाढून 308 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या आज 2 ने वाढून 21 वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 3502 जणांची कोरोना स्वॉब चाचणी घेण्यात आली. यापैकी 3360 अहवाल प्राप्त झाले. यात 3052 निगेटिव्ह तर 308 पॉझिटिव्ह आहेत. बुधवारी एका दिवसात 129 अहवाल प्राप्त झाले यात 98 निगेटिव्ह तर 31 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 15 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.

आज मृत पावलेल्यांमध्ये गुरूनानक नगर परिसरातील 60 वर्षीय व्यक्ती आहे. दि. 11 रोजी सायंकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला; तर दुसरी व्यक्ती इंदिरा वसाहत भवानी पेठ येथील 72 वर्षीय पुरूष आहे. या व्यक्तीचा मृत्यू 12 मे रोजी झाला.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 308 मध्ये 173 पुरूष तर 135 महिलांचा समावेश आहे. तर मृत 21 पैकी 11 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे. रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या 84 असून यात 55 पुरूष तर 29 महिलांचा समावेश आहे.