सुनावणीला दांडी मारल्याने प्रणिती शिंदे यांना सोलापूर कोर्टाचे वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress mla praniti shinde

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुह्यात न्यायालयातील सुनावणीला दांडी मारल्याने काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. प्रणीती शिंदे यांच्यासह नगरसेवक चेतन नरोटे यांना बुधवारी सोलापूर जिल्हा न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावले. न्यायालयाने त्यांना आता 3 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

गेल्या वर्षी 2 जानेवारीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असतानाच प्रणीती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारी रुग्णालयांतील प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले होते. पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती.