सोलापूरच्या उपमहापौरांची मनपा आयुक्तांना कारवाईची धमकी, बैठकीला बोलविले नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाचे उपमहापौर राजेश काळे व पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यातील वाद विकोपास गेला असून, पालिका पदाधिकाऱयांच्या बैठकीस न बोलविल्याप्रकरणी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकी उपमहापौर राजेश काळे यांनी दिली आहे.

सोलापूर मनपाच्या वतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात विभागीय कार्यालय क्रमांक 3 व 4 ची कोरोनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस उपमहापौर राजेश काळे वगळता सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या महत्त्वाच्या बैठकीस उपमहापौर राजेश काळे हे उपस्थित नव्हते. बैठकीबाबत माहिती न दिल्याचा आरोप करीत आयुक्त पी. शिवशंकर हे वारंवार डावलत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची धमकी दिली आहे.

या बैठकीस सभागृह नेता श्रीनिवास करली, उपायुक्त धनराज पांडे, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, नागेश भोगडे, नगर अभियंता संदीप कारंजे, मनोज शेजवाल, कामिनी आडम आदी उपस्थित होते.