सोलापूर जिल्ह्याचा आकडा 949 वर, 394 रुग्ण बरे झाले तर 467 जणांवर उपचार सुरू

493

सोलापूर जिल्ह्यात आज अखेरपर्यंत 949 पर्यंत कोरोना रूग्णांची नोंद झाली, तर मृतांची संख्या 88 झाली आहे. जिल्ह्यात 394 जण बरे झाले आहेत तर 467 जणांवर उपचार सुरू आहेत.

एकूण 949 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 535 पुरूष तर 414 महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 7892 जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील 7311 अहवाल प्राप्त झाले आहेत तर 581 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात 6362 निगेटिव्ह तर 949 पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

आज एका दिवसात 275 अहवाल प्राप्त झाले यात 191 निगेटिव्ह तर 84 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 40 पुरूष, 44 महिलांचा समावेश आहे. आज 5 जण मृत झाले यात 3 पुरूष, 2 महिलांचा समावेश आहे. आज 14 जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं.

आपली प्रतिक्रिया द्या