
सोलापूर जिह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राची संख्या वाढवून दररोज सध्यापेक्षा दुप्पट नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिकशंकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, उपायुक्त वैशाली कडूकर उपस्थित होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट वाढवले पाहिजे, त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा, असे शंभरकर यांनी सांगितले. सध्या शहर आणि जिह्यात दररोज सुमारे सात हजार जणांना लस दिली जात आहे. आता नवीन केंद्रे निश्चित करून येत्या आठवडय़ात दररोज चौदा हजार जणांना लस देण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
सोलापुरात सध्या 91 शासकीय लसीकरण केंद्रांत आणि 25 खासगी दवाखान्यांत लस दिली जाते. आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण इस्पितळात लस दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शासनाची मान्यता घेऊन, खासगी दवाखान्यातील लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढवली जाणार असल्याचे लसीकरण समन्कयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.
आश्विनी ग्रामीण रुग्णालय येथे येत्या तीन-चार दिवसांत टेस्टिंगला सुरुवात होईल. त्यानुसार दररोज सुमारे दोन हजारहून अधिक आरटीपीसीआर टेस्ट करता येतील, असे वैशंपायन महाविद्यालयाच्या डॉ. शेख यांनी सांगितले. बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेक दुधभाते, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, उपायुक्त धनराज पांडे आदी उपस्थित होते.

































































