सोलापूर शहरात चारनंतर लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज नवा आदेश काढून दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

राज्य शासनाने सोलापूर महापालिका क्षेत्र स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून निर्णय घेण्यास मान्यता दिली असून, महापालिका क्षेत्रात लेव्हल 3 चे निर्बंध लागू करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी यापूर्वी 27 जून 2021 व 28 जून 2021 च्या शुद्धपत्रकातील आदेशच 26 जुलै 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू केला आहे. या आदेशानुसार दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.