झाडाच्या पानांवर अफलातून कलाकृती! व्यंगत्वावर मात करत बार्शीच्या महेश मस्केची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनात जिद्द असेल आणि मनापासून काम करण्याची इच्छा असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हेच तंतोतंत खरं ठरवलंय ते बार्शीतील महेश अशोक मस्के या युवा कलाकाराने. जन्मतः डाक्या डोळ्याने अंध असूनही आपल्या व्यंगत्कावर मात करत त्याने चित्रकलेच्या क्षेत्रात मोठे नाव कमाकले आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रकलेसाठी पेपर न मिळाल्याने महेशने चक्क वेळी, कड, नारळ, पिंपळ आदी झाडांच्या पानांवर अफलातून कलाकृती साकारल्या आहेत. त्याच्या या कलाकृतींचे फोटो सोशल मीडियाकर व्हायरल होत आहेत.

29 वर्षीय महेश हा बार्शीतील जामगाव (पा) इथला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महेशला लहानपणापासूनच चित्रकलेची आकड. गाई-म्हशी राखताना तळ्याकाठच्या चिखलावर त्याने चित्र रेखाटायला सुरुवात केली. तिथूनच त्याला या विषयाची आकड निर्माण झाली. शाळेत त्याने चित्रकलेत अनेक बक्षिसे, शिष्यकृत्ती मिळवली. त्या पैशांतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. बार्शीला कलाशिक्षकाची पदवी मिळविल्यानंतर पुढे त्याने पुण्यात शिल्पकलेचे धडे गिरवले. झाडांच्या पानावरील आपल्या आगळ्याकेगळ्या कलाकृतींबद्दल दैनिक ‘सामना’शी बोलताना महेश म्हणाला, ‘‘गेल्या तीन कर्षांपासून मी पुण्यातील भारती विद्यापीठाजवळ मुलांना चित्रकलेचे धडे देतो. गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाल्याने मी बार्शीत परतलो. कलेशिवाय मी एकही दिवस जगू शकत नाही. त्या काळात चित्रकलेसाठी रंग, ड्रॉइंग पेपर मिळत नव्हते. त्यामुळे झाडांच्या पानांवर कलाकृती साकारायला सुरुवात केली. आजवर मी देवी-देकता आणि महापुरुषांसह सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील दिग्गजांची शेकडो क्यक्तिचित्रणे पानांवर रेखाटली आहेत. सोशल मीडियावर या कलाकृतींना तुफान प्रतिसाद मिळतोय. अनेक दिग्गजांनीही माझ्या कलेचे कौतुक केले आहे.’’

झाडाच्या पानावर एक व्यक्तिचित्र साकारण्यासाठी महेशला तीन ते पाच तास लागतात. व्यक्तिचित्रण करताना त्यात किती डिटेल्स आहेत, पानाचा आकार त्यानुसार वेळचे गणित ठरते. सुरुवातीला पानांवर तो ड्रॉइंग करतो. त्यानंतर नको असलेला भाग कटरच्या सहाय्याने दूर केला जातो.

प्रत्येकाच्या अंगात कला असते फक्त तिचा शोध घेता आला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्यातील कला जोपासण्याची संधी मिळाली. पानांकर व्यक्तिचित्र रेखाटताना मी त्यातला नको असलेला भाग जसा वेगळा करतो त्या प्रकारे आपणदेखील आपल्या आयुष्यातला नकारात्मक भाग दूर करून जीवनाचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. – महेश मस्के

कलेतून केली जनजागृती

लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या माध्यमांतून राज्य सरकार लोकांना ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असे आवाहन करत होते. महेशनेदेखील या काळात हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या कलेचा आधार घेतला. याशिवाय ज्या व्यक्ती विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करतायत त्यांचे कौतुकही तो कलेच्या माध्यमातून करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात ज्या प्रकारे राज्यातील लोकांसाठी चांगले काम करतायत त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी महेशने वेळीच्या पानावर त्यांचे व्यक्तिचित्र साकारले आहे.