प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार एका क्लिकवर झाला जमा, सीईओ दिलीप स्वामी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सोलापूर जिह्यातील 9 हजार 433 प्राथमिक शिक्षकांना ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे पगार जमा होणार आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत पगार देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज सीएमपी प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख अशा एकूण 9433 जणांचा पगार स्वामी यांच्या हस्ते एका क्लिकवर जमा करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी प्रमुख उपस्थित होते.

प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी दूर करून दरमहा 1 तारखेला शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे वेतन थेट जिल्हास्तरावरून त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार व चंद्रकांत सुर्वे, यांच्या टीमने मेहनत घेतली. महिंद्रा कोटक बँकेची मदत घेऊन कमी कालावधीत काम पूर्ण केले.

शिक्षकांची परवड होणार नाही

n जिल्हा परिषदेमध्ये 18 हजारांपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी काम करतात. शिक्षक व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अशा 9433 कर्मचारी यांना 10 ते 15 दिवस पगारासाठी वाट पाहावी लागायची. यामधील सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून सर्व कपात रक्कम वजा करून निव्वळ पगार शिक्षकांच्या बँक खात्यात दरमहा 1 तारखेला जमा होणार आहे. शिक्षकांनी स्वच्छ सुंदर शाळांमध्ये चांगले काम केले आहे. यापुढे पगारासाठी निवेदन घेऊन कोणी येणार नाही. सीएमपीद्वारे पगार देणारा सोलापूर जिल्हा हा राज्यातील दुसरा जिल्हा आहे. यापूर्वी जालना जिह्याने शिक्षकांसाठी ही प्रणाली राबविली आहे, अशी माहिती दिलीप स्वामी यांनी दिली.