
सामना ऑनलाईन । मुंबई
ब्रेबॉर्न स्टेडियमच्या छतावर जगातील सर्वात मोठा सोलार पॉवर प्लँट बसवण्यात आला असून यामुळे स्टेडियमच्या विजेच्या बिलात दरवर्षी 1 कोटी 25 लाख रुपयांची बचत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्लँटचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या दक्षिण व उत्तर स्टँडच्या छतावर 2 हजार 280 सोलार पॅनेल बसवण्यात आले आहेत. या सोलार पॅनेलमुळे दरवर्षी 11 लाख 5 हजार युनिट विजेची निर्मिती होईल. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या विजेच्या बिलात बचत होईल, तसेच दक्षिण मुंबईतील वातावरण प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. टाटा सोलर पॉवरमार्फत 120 दिवसांत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.



























































