‘ईटीपीबीएस’ मतपत्रिकांद्वारे एक लाखाहून अधिक जवान करणार मतदान

508

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तब्बल 1 लाख 17 हजारांहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलांमधील जवान मतदान करणार आहेत. या मतदारांची सर्व्हिस वोटर्स म्हणून नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम’द्वारे म्हणजेच ‘ईटीपीबीएस’ ऑनलाइनरीत्या मतपत्रिका पोहचवल्या जाणार आहेत.

अशी असते यंत्रणा

  • मतदानाच्या साधारणतः 10 दिवस आधी सर्व्हिस वोटर्सना ईटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात.
  • या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट करून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर ते पोस्टाने पाठवणे आवश्यक असते. टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची गरज नसते.

यांच्यासाठी ईटीपीबेस

  • सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाबाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान.
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान.
  • निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलामधील जवान.
  • जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी.
  • परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार

यावेळी राज्यात 1 लाख 17 हजार 581 इतके सर्व्हिस वोटर्स आहेत. या मतदारांच्या अंतिम यादीनुसार 1 लाख 14 हजार 496 पुरुष तर 3 हजार 581 इतके सर्व्हिस वोटर्स आहेत. सर्वाधिक 12 हजार 658 इतके सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात असून सर्वात कमी 310 इतके पालघर जिल्ह्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या