14 ऑगस्टला मुंबईत सोल्जरेथॉन

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने फिटीस्थान या संघटनेने 14 ऑगस्टला मुंबईत सोल्जरेथॉन 75 फ्रीडम रनचे आयोजन केले आहे. परेलच्या अशोक टॉवरपासून रविवारी सकाळी 6.30 वाजता सुरू होणारी ही शर्यत 7.5 किमी अंतर किंवा 75 मिनिटे चालण्याची असेल. ‘एक फिट भारत’ असे या शर्यतीचे घोषवाक्य असेल, अशी माहिती फिटीस्थानचे सहसंस्थापक डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी दिली आहे.