चीन मधील सैनिक उडून करणार शत्रूंचा सामना

चीन हा तंत्रज्ञानात विकसित असलेला देश आहे. त्यांच्या तंत्रज्ञान विकासाचे अनेक नमुने आपण सोशल मीडियावरच्या व्हिडीओमधून दिसून येते. फक्त तंत्रज्ञानच नव्हे तर गणित, विज्ञान, वनौषधी या क्षेत्रांमध्येही चीनने उत्तम प्रगती केली आहे. आता या चीनचं पाऊल अजून एका नव्या प्रगतीच्या दिशेने पडत आहे.

चीन आपल्या सैन्यासाठी एक खास पोशाख बनवण्याच्या प्रयत्नात आहे. या पोशाखामुळे चिनी सैनिक अधिक क्षमतेने युद्ध करू शकतील. हॉलिवूडपटांमधील आयर्न मॅनच्या धर्तीवर हे पोशाख तयार केले जाणार आहेत. चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मी या योजनेवर काम करत आहे. हा पोशाख घातल्यानंतर सैनिक अनेक शस्त्रे आणि दारुगोळा घेऊन हवेत उडू शकतील.

चीनच्या ग्लोबल टाइम्सनेही या संबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे. अत्याधुनिक अशा एक्सोस्केलेटन सिस्टिम नावाच्या प्रणालीच्या साहाय्याने ही योजना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न पीपल्स आर्मी करत आहे. सैनिकाला झेप घेता येऊ शकेल असे पोशाखही बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या