मोदींची सूचनेनंतर सोमनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू!

752

गुजरातमधील प्रसिद्ध प्राचीन सोमनाथ शिवमंदिरातील पुजाऱ्यांसाठी सोमनाथ देवस्थान न्यासने विशेष ड्रेस कोड लागू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिर दर्शनाच्या वेळेस मंदिराच्या विश्वस्थांना तशी सूचना केली होती. आता भगवा रेशमी सदरा आणि रेशमी लाल धोतर आणि रेशमी उपरणे अशा पवित्र गणवेशात भगवान सोमनाथाचे पुजारी पूजा करताना भाविकांना दिसणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनंतर सुमारे 15 महिने राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनएफआयटी) गांधीनगरच्या अभियंता कारागिरांनी सोमनाथ मंदिरातील पुजाऱ्यांच्या पूजेदरम्यानच्या वावर आणि हालचालींचा अभ्यास केला. त्यानंतर जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या गर्भगृहाचे पावित्र्य राखता येईल असा रेशमी गणवेश मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी सुचवला. आता नव्या पवित्र लूकमध्ये सोमनाथ मंदिराचे पुजारी भगवान सोमनाथाची पूजा करतांना दिसणार आहेत.

‘भगवान सोमनाथ मंदिराच्या गर्भगृहाची भव्यता आणि पावित्र्य यांचे दर्शन जगभरातील भाविकांना घडविणे हा पुजाऱ्यांच्या ड्रेस कोडमागचा मुख्य हेतू आहे. अनेक वर्षानंतर भगवान सोमनाथाच्या पुजाऱ्यांना त्यांची वेगळी ओळख या नव्या गणवेशामुळे मिळाली आहे’, अशी प्रतिक्रिया सोमनाथ न्यासाचे विश्वस्त प्रवीण के लहरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या