आईच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये आई- मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 70 वर्षाच्या आईच्या मृतदेहावर मुलाने बलात्कार केला असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

70 वर्षीय महिलेला फुफ्फुसाचा विकार होता त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रकृती खालावल्याने या महिलेला इंदौरमधील महाराजा यशवंतराव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने मृतदेह रुग्णालयातून नेला. त्यानंतर 22 वर्षाच्या नराधम मुलाने ग्वालटोली परिसरात एका गल्लीत  आईच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. ही घटना 1 आणि 2 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून हा बलात्कार करताना मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे.

जवळच्याच एका वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पलासिया पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश जमरे यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले आहे की आरोपी हा मनोरुग्ण आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याला अटक करण्यात आलेली नाही. या नराधमाला भारतीय दंड विधानाच्या कलम  297 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.