टिकटॅाक स्टार सोबत झाला लाखोंचा गंडा

975

दुकान आणि फ्लॅटच्या खरेदीच्या नावाखाली टिकटॅाक स्टार आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सोनाली फोगट यांची फसवणूक करण्यात आली आहे.  याप्रकरणी सोनाली यांनी मिलगेट पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि 7 जणांना अटक केली. या आरोपींमध्ये सोनाली यांच्या दिराचाही समावेश आहे.

सोनाली यांच्या दिराचे नाव विकास आहे. रामअवतार मित्तल नावाच्या व्यक्तीकडून विकास याने सोनाली फोगाट यांना एक दुकान खरेदी करून दिलं होत. यासाठी फोगाट यांनी साडेआठ लाख रुपये दिले होते. मात्र सोनाली यांना नंतर कळालं की हे दुकान रामअवतार आणि विकास या दोघांनी मिळून तिसऱ्यालाच विकून टाकलं होतं. अशाच पद्धतीने विकास याने सोनाली यांना एक जागा विकत घ्यायला लावून त्यामध्येही त्यांना फसवलं. विकासने सोनाली यांच्याकडून लाखों रुपये घेतले होते, जे त्याने आजपर्यंत परत केलेले नाहीये. 17 डिसेंबरला विकासला सोनाली यांनी पैसे परत करण्यासंसदर्भात पुन्हा जाब विचारला. यावर विकासने मला धमकावलं असा आरोप सोनाली यांनी लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या