
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसाचारावर एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी मणिपूरच्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मणिपूर हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्यावर जखम झाल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
The unprecedented violence that has devastated the lives of people in Manipur has left a deep wound in the conscience of our nation.
I am deeply saddened to see the people forced to flee the only place they call home.
I appeal for peace and harmony. Our choice to embark on the… pic.twitter.com/BDiuKyNGoe
— Congress (@INCIndia) June 21, 2023
या व्हिडीओत सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरच्या नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या अभूतपूर्व हिंसाचाराने देशाच्या आत्म्यावर खोलवर जखम झाली आहे. आपल्या हक्काच्या घराला सोडून जाण्यासाठी भाग पडणं हे सर्वाधिक त्रासदायक आहे. आपण गेल्या 50 दिवसांपासून मणिपूरमध्ये मानवनिर्मित संकट सुरू आहे. या हिंसेने राज्यातील हजारो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी त्या सर्वांप्रति सहवेदना व्यक्त करते, ज्यांनी या हिंसाचारात त्यांच्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे. शांततापूर्वक जीवन व्यतित करणाऱ्या बहीण-भावांना एकमेकांविरुद्ध लढताना पाहणं हे अतिशय विदीर्ण चित्र आहे, असं म्हणत गांधी यांनी मणिपुरी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

























































